
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात येत्या बुधवारपासून (दि. १७) ‘यशवंतराव चव्हाण: मॉडेल ऑफ एग्रो इंडस्ट्रीयल सोसायटी’ या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सकाळी १० वाजता चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. अर्थशास्त्र अधिविभागाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे असतील.
विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट व गांधी अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. जयंत लेले, डॉ. अभय टिळक, डॉ. भारती पाटील, डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. प्रदीप पुरंदरे, डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. डोरा लेले, डॉ. नितीन बिरमल, डॉ. महेश साळुंखे, डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. राजन गवस, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. प्रकाश पवार आदी सहभागी होणार आहेत.
Leave a Reply