
कोल्हापूर : राष्ट्रीय बांबू अभियानाअंतर्गत कोल्हापूर सामाजिक वनीकरण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बांबू प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर येथील सासने ग्राऊंड, न्यू शाहूपुरी येथे दि. 13 ते 15 फेब्रुवारी 2016 पर्यंत बांबू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्यघ्र प्रकल्प डॉ. व्ही क्लेमेंट बेन, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी एस. एल. झुरे, एम. एस. भोसले, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक टी. पी. पाटील, सहायक संचालक नरेंद्र राजाज्ञा, गोकुळचे संचालक अरुण नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
फार प्राचिन काळापासून बांबूचा मानवी जीवनामध्ये वापर होत आहे. सध्याच्या काळात तर औद्योगिक वापर, कागदासाठी कच्चा माल, कांडी कोळसा, ब्रिकेट्स निर्मिती, पार्टीकल बोर्ड, धागा निर्मिती पासून वीज निर्मिती पर्यंत बांबूचा उपयोग वाढला आहे. बांबू सर्व वर्गातील लोकांसाठी फायदेशीर व उपयोगी आहे. बांबू लागवडी बद्दल अधिकाधिक जागरुकता होऊन शेतकरी, बांबू शिल्पकार, फर्निचर उत्पादक, बांबू व्यापारी, बांबु उत्पादक यांच्या दृष्टीने बांबू सामाजिक व आर्थिकदृष्ट महत्वपुर्ण उत्पादन आहे. भारतात मोठ्याप्रमाणात बांबूची निर्मिती होत असली तरी निर्यात मात्र अत्यंल्प प्रमाणात होते. निर्यातीचे प्रमाण वाढल्यास शेतकरी व यावर आवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना मोठ्याप्रमाणात आर्थिक लाभ होईल. या प्रदर्शनात बांबू पासून बनविलेल्या विविध कलावस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून याला सर्वांची पंसती मिळत आहे.
Leave a Reply