
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौर्यावर आहेत. बीकेसीत भरलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाचं त्यांनी उद्घाटन केलं. त्यानंतर पंतप्रधानांनी इथं लागलेल्या भारतीय कंपन्यांच्या स्टॉल्सनाही दिली. या सोहळ्यासाठी फिनलँडचे पंतप्रधान आणि स्वीडनचे पंतप्रधानही आवर्जून उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांचं स्वागत केलं. या औद्योगिक प्रदर्शनात भारतीय बनावटीच्या वस्तू ठेवण्यात आल्यात. अगदी पुणेरी पगडीचाही या प्रदर्शनात समावेश करण्यात आलाय.
दरम्यान, द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या नवीन इमारतीचं उद्घाटनही मोदींच्याच हस्ते झालं. रंगशारदा इथं हा उद्घाटन सोहळा झाला. या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल सी विद्यासागर राव उपस्थित होते. यावेळी मोदींनी कला ही राजाश्रयीत नव्हे तर ती राजपुरस्कृत असावी अशी इच्छा व्यक्त केली. स्थानिक कलाकरांची पेटिंग्ज यापुढे रेल्वेस्टेशनच्या शोकेस गॅलरीत लावली जातील, असंही मोदींनी यावेळी सांगितलं
Leave a Reply