
मुंबई :महाराष्ट्रातील मेक इन इंडिया अंतर्गत मेक इन महाराष्ट्रातील कार्यक्रमाला आज गालबोट लागले. मुंबई मधील महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाच्या स्टेजला अचानक भीषण आग लागली. अनेक मान्यवर आणि परदेशी पाहुण्याना सुखरूप बाहेर काढले गेले.
मंचावर लावणीचा कार्यक्रम सुरु असतानाच मेक अप रुमला आग लागून पसरत गेली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांसारखे अनेक दिग्गज उपस्थित होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.अभिनेत्री पूजा सावंत सेटवर लावणी सादर करत असतानाच मंचाच्या खालील बाजूने आग लागली. त्यानंतर संपूर्ण सेटवर आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केलं. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी मंचव्यवस्था केली होती.काहीच वेळापूर्वी अमिताभ बच्चन यांचा कार्यक्रम सादर झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्यपाल, अभिनेता आमीर खान यासारखे अनेक लहानमोठे कलाकार यावेळी उपस्थित होते.
अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. त्याचप्रमाणे 6 वॉटर टँकर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे
Leave a Reply