
कोल्हापूर : बस चालवताना चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने मीरज-गणपतीपुळे एसटीचा अपघात झाला. पन्हाळा तालुक्यातील नावली गावाजवळ सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
अपघातात चालक बाबुराव सावंत यांचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गाडी चालवत असताना सावंत यांना ह्रदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याच्या तोंडातून फेस यायला लागल्याने त्यांचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस झाडाला जाऊन आदळली.
अपघातातील जखमींवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पण या अपघातामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा कामावारच्या ताणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Leave a Reply