शताब्दी निमित्ताने श्री क्षात्र जगतगुरु पीठाच्या बोधचिन्हाचे अनावरण

 

कोल्हापूर: राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी 11 नोव्हेंबर 1920 रोजी, श्री क्षात्र जगतगुरु पीठाची स्थापना केली. या घटनेस 100 वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त श्री क्षात्र जगतगुरु पीठ, पाटगांव यांच्या माध्यमातून हे वर्ष अनेक समाजाभिमूख उपक्रमांनी साजरे करण्याचे ठरविले आहे. श्रीमत क्षात्र जगतगुरु महाराजांच्या विचारांचा देशात सर्वदूर प्रचार व प्रसार होवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे कार्य प्रामुख्याने करण्यात येणार आहे. याचबरोबरीने समाजाला स्वावलंबी तसेच सुसंस्कृत करणारे व आजच्याकाळानुरुप बदल स्विकारुन विविध समाजउपयोगी उपक्रमांचे आयोजन संपूर्ण वर्षभर श्री क्षात्र जगतगुरु पीठा मार्फत करण्यात येणार आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या समाजाची सुधारणा आपणच केली पाहीजे व त्यासाठी सर्वसामान्य लोकांना ज्ञानाची मशाल दाखविली पाहीजे असा उद्देश ठेवला होता. त्यानूसार समाजातील तरुणांनी स्वत:च्या पायावर उभे राहिल्यावाचून मार्ग नाही आणि परिस्थितीशी जुळवून घेऊन टिकून राहील्यास प्रगती होते, हे जगदगुरु महाराजांचे सुत्र होते. यास अनुसुरुनच समाजातील प्रत्येक वर्गास उपयुक्त आणि प्रगतीपथावर देणारे विविध उपक्रम या शतकमहोत्सवी वर्षात आयोजित करण्यात आले आहेत.तरी यानिमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी संजयसिंह बेनाडीकर, महेंद्रसिंह बेनाडीकर, हर्षल बेनाडीकर, अश्विनी बेनाडीकर, शिवजीत बेनाडीकर, मनजीत बेनाडीकर, विनीत बेनाडीकर, सुजीत मोहिते, इंद्रजीत सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!