महापालिकेची व्हिक्टर पॅलेसवर सिलबंदची कारवाई

 
IMG_20160216_220610कोल्हापूर : घरफाळा थकबाकी प्रकरणी आज जुना पुणे-बेंगलोर रोडवरील हॉटेल व्हिक्टर पॅलेस सिलबंद करणेची कारवाई  महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाने केली.
शहरातील जुना पुणे-बेंगलोर रोड लगत रि.स.नं.2103 पैकी 7 व 8 या मिळकतीचे मालक विजय व विक्रमसिंह हिंदूराव अपराध हॉटेल व्हिक्टर पॅलेस या मिळकतीचे सन 2012 ते 2016 अखेर दंडासह कराची थकबाक रु.26,31,188/- इतका आहे. या मालमत्ता कराच्या थकबाकीबाबत मा.आयुक्त को.म.न.पा. यांनी दि.15/12/2015 रोजी सुनावणी घेवून सदरची रक्कम पुढील 7 दिवसात जमा करावी असा आदेश दि.18/12/2015 रोजी मिळकत मालक यांना लागू केलेला आहे. सदर आदेशाप्रमाणे कारवाई करु नये कराची रक्कम जमा करीत आहोत. त्यासाठी मुदत मिळावी म्हणून अशी वेळोवेळी विनंती केली आहे.
वेळोवेळी मुदत वाढ देवूनही त्यांनी मालमत्ता कराची थकीत रक्कम महानगरपालिकेकडे जमा केली नसलेमुळे आयुक्त यांनी दि.18/12/2015 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील प्रकरण 8 कराधान नियमचे नियम क्रं.42,43,47 (4) तरतुदीप्रमाणे कारवाई करणेची पुर्व कल्पना हॉटेल व्हिक्टर पॅलेसचे प्रतिनिधी दयानंद सुतार यांचे मार्फत मिळकत मालक यांना दिलेली होती. मात्र त्यांनी आजही रक्कम जमा न केलेने व महानगरपालिकेच्या कारवाईस कोणताही प्रतिसाद न दिलेने सदरची मिळकत आज रोजी मुख्य दरवाजास सिल लावून सिलबंदची कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई आयुक्त यांचे आदेशावरुन उप-आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, करनिर्धारक व संग्राहक अधिकारी दिवाकर कारंडे व ई वॉर्ड राजारामपूरी विभागाचे कर अधिक्षक दिपक टिकेकर, सहा.अधिक्षक राहूल लाड व सचिन लोखंडे, महेंद्र कडोकर, रमेश गायकवाड, प्रमोद कांबळे यांचे समवेत सदर कारवाई करणेत आली आहे.
महानगरपालिकेच्या चार विभागीय कार्यालयाकडे घरफाळा वसूलीच्या कारवाईसाठी चार कारवाईचे पथके केलेली आहेत. या पथकाच्या नियंत्रण अधिकारी यांना थकबाकी असणाऱ्या मिळकतीवर कारवाई करणेचे आदेश आयुक्त यांनी दिलेली आहेत. शहरातील मिळकत धारकांनी त्यांची कराची रक्कम महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये किंवा शहरातील  व एच.डी.एफ.सी. बँकेच्या कोणत्याही शाखेत जमा करावी असे अहवान महानगरपालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!