
कोल्हापूर :अखिल भारतीय युवक मराठा महासंघ कोल्हापुर च्यावतीने शिवजयंती निमित्य छत्रपति शिवरायांच्या जीवनावर आधारित लहान मुलांनी रेखाटलेल्या सुंदर चित्रांचे प्रदर्शन व शिवभक्त दिलावर पठान यांनी संग्रहित केलेल्या नाण्यांचे व शिवराई चे प्रदर्शन शाहु स्मारक भवन दसरा चौक येथे प्रदर्शित करण्यात आली. या प्रदर्शनाचा शुभारंभ उद्योजक दिलीपराव पाटील व जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक(नाना) यांचे हस्ते करण्यात आला .यावेळी कृष्णजी हरुगडे, उत्तम जाधव, शंकरराव शेळके, श्रीनिवास गायकवाड़, साजिद खान, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, प्रकाश पाटील, महादेव पाटील आदि उपस्थित होते. स्वागत व आभार युवक अध्यक्ष अवधुत पाटील यानी मानले.यावेळी शिवभक्त,कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply