
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त येत्या ११ मार्च रोजी शिवाजी विद्यापीठासह कार्यक्षेत्रातील १२५ महाविद्यालयांत एकाच वेळी बाबासाहेबांच्या विविध पैलूंविषयी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ११ मार्च रोजी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांची जयंती आहे. बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिल्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती साध्य झाली. त्यामुळे यानिमित्ताने सयाजीराव महाराजांविषयीही कृतज्ञता व्यक्त करण्यात येईल. या १२५ व्याख्यानांचा एकत्रित संग्रह विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्यात येईल. विषय व वक्ता निवडीचे स्वातंत्र्य संबंधित महाविद्यालयांना राहील. विद्यापीठातील व्याख्यानासह या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक डॉ. कृष्णा किरवले करतील, अशी माहितीही कुलुगरूंनी दिली.
Leave a Reply