
कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाच्या शिष्टमंडळात प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, तंत्रज्ञान अधिविभागाचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. साहू व एस.एम. भोसले यांचा समावेश होता.या दौऱ्याअंतर्गत विविध विद्यापीठे, प्रयोगशाळा व इतर महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. शिवाजी विद्यापीठ व डाँगुक विद्यापीठ येथील पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावर शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्यामध्ये शिक्षणविषयक तसेच संशोधनपर माहितीची, विचारांची व सुविधांची देवाणघेवाण होण्याच्या दृष्टीने उभय विद्यापीठांदरम्यान एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी तर डाँगुक विद्यापीठाच्या वतीने प्रेसिडेंट डॉ. हॅन ताए सीक व व्हाईस प्रेसिडेंट वोनाबे ओह यांनी स्वाक्षरी केल्या.
या प्रसंगी डॉ. सीक यांनी शिवाजी विद्यापीठाशी विज्ञान-तंत्रज्ञानविषयक सहकार्याबरोबरच भारतीय संस्कृती व मानव्यविद्या विषयांच्या बाबतीतही सहकार्य वृद्धी करण्याच्या दृष्टीनेही सदर सामंजस्य करार उपयुक्त ठरेल, अशी आशा व्यक्त केली. त्याचप्रमाणे, सध्या डाँगुक विद्यापीठात शिवाजी विद्यापीठाचे जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, संशोधन करीत आहेत, त्यांच्या कार्याने आपण अत्यंत प्रभावित झालो असून सदर सामंजस्य करार हा त्याचेच फलित असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी डाँगुक विद्यापीठाचे इंटरनॅशनल अफेअर्स विभागाचे डीन यांगवू पॉल कीम, सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्सचे उपसंचालक (रिसर्च) प्रा. सँग यू उपस्थित होते.
या सामंजस्य करारानंतर डाँगुक विद्यापीठातील विविध सुविधा व प्रयोगशाळांची शिष्टमंडळाने पाहणी केली. विशेषतः ‘लॅबोरेटरी ऑफ एनर्जी मटेरियल्स ॲन्ड कॅरेक्टरायझेशन’ या प्रयोगशाळेस दिलेली भेट महत्त्वपूर्ण ठरली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साधन सुविधांनी सुसज्ज अशा या प्रयोगशाळेत सोडियम आयन प्रकारच्या बॅटरीच्या निर्मितीवर सध्या मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. त्याचप्रमाणे सेमीकंडक्टर व भौतिकशास्त्र प्रयोगशाळांनाही भेट देण्यात आली. या ठिकाणी रँडम ॲक्सेस मेमरी (RAM) उपकरणांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे.
Leave a Reply