
कोल्हापूर: गोकुळ म्हणजे सहकाराच्या आदर्शातून निर्माण झालेल्या समृद्धीचे प्रतिक असे गौरवोद्गार डॉ. सागर देशपांडे यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघा मार्फत गोकुळचे संस्थापक आणि शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण नरके होते. कार्यक्रमाच्या स्वागत व प्रास्ताविकामध्ये बोलताना संघाचे कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर म्हणाले की, गोकुळ दूध संघाच्या विकासामध्ये स्वर्गवासी आनंदराव पाटील-चुयेकर यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. जिल्ह्यातील गोर-गरीब दूध उत्पादक शेतक-यांना गोकुळ दूध संघामुळे दर दहा दिवसाला पैसे मिळत असल्याने त्यांचे जिवनमान उंचावले आहे. याचे सर्व श्रेय स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांना जाते.सहकारी संस्था स्थापन करणे, चालविणे सोपे आहे पण यशस्वी करणे अतिशय अवघड आहे. परंतु गोकुळचे शिल्पकार आनंदराव पाटील चुयेकर आणि गोकुळचे विद्यमान आणि जेष्ठ संचालक यांनी ते यशस्वी करून दाखवत महाराष्ट्रात एक नवा आदर्श निर्माण केला.स्मृतिदिनानिमित्त संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले. यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन ताराबाई पार्क येथील कार्यालयात केले व गोकुळ येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ.सागर देशपांडे यांपती संभाजी महाराज यांची मुत्सद्देगीरी आणि व्यवस्थापन कौशल्य” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होतेे.तसेच कार्यक्रमाचे सुञसंचलन .एम.पी.पाटील यांनी केले तर आभार बोर्ड सेक्रेटरी.एस.एम.पाटील यांनी मानले.यावेळी संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक.अरुण नरके,.रणजितसिंह पाटील,.श्री.विश्वास पाटील.अरुण डोंगळे, आमदार व संचालक राजेश पाटील, संचालक धैर्यशिल देसाई, श्पी.डी.धुंदरे,.विलास कांबळे, संचाललिका सौ.अनुराधा पाटील सरुडकर कार्यकारी संचालक .डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply