
कोल्हापूर : शहर व डिझेल पेट्रोल दरवाढ विरोधी सर्व पक्षीय कृती समितीने खासदार संजय मंडलिक यांची घेवून पेट्रोल व डिझेलचे झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे या महागड्या इंधनातून शासन अबकारी रुपात नागरीकांचे शोषन करत असून शासनाने इंधन वाढ रोखावी याकरीता निवेदन दिले.
आपला देश हा विकसनशील अवस्थेतील देश असून, विकसित देशाचे उद्दीष्ट आपलेला गाठावयाचे आहे. तसेच, लॅाकडाऊन काळामध्ये झालेली औद्योगिक, आर्थिक मंदी सर्वसामान्यांना महागाईच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक उपयांपैकी दळणवळण स्वस्त होणे हा एक उपाय आहे. याकरीता दळणवळणासाठी आवश्यक असणारे इंधन हे पहिल्यांदा स्वस्त होणे गरजेचे असल्याकारणाने तातडीने केंद्रीय पेट्रोलीयम मंत्री नाम. धर्मेंद् प्रधान यांना निवेदनाव्दारे इंधन दर सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात आणणेबाबत कळविले आहे. कोल्हापूर शहर व डिझेल पेट्रोल दरवाढ कृती समितीच्यावतीने बाबा इंदूलकर, आर.के.पोवार, मारुतराव कातवरे, बाबा पार्टे, अमरसिंह निंबाळकर, किशोर घाटगे, अशोक भंडारे, दिलीप देसाई, अभयकुमार शिंदे, काँ. दिलीप पोवार, अनिल घाटगे, दुर्गेश लिंग्रस, राहूल लायकर, अनिल कदम, वसंत तोडकर, विजय यादव, प्रविण स्वामी, सुधाकर मातुगडे, रमेश पुरेकर, पी.जी.स्वामी, जाफर मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply