
कोल्हापूर : शेती औजारे आणि ट्रैक्टर उत्पादन करणारी देशातील नामांकित कंपनी टाफे च्या वतीने सांगली जिल्ह्यातील येलुर येथे शेतकरी दिवस हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात 400 शेतकरी सहभागी होणार असून चर्चा सत्रे आणि व्याख्याने याद्वारे शेतकऱ्या ना मार्गदर्शन केले जाणार आहे अशी माहिती कंपनीचे माहिती व तंत्र ज्ञान प्रमुख अधिकारी एस. राम कृष्णन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आज येलुर येथील साई मंगलम सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊस हे प्रमुख पीक आहे. त्या अनुषंगाने शेती उपयुक्त जमीन तयार करणे, बी बियाणे तंत्रज्ञान याविषयी सुधारित सराव पद्धती, सिंचन शेती याविषयी माहिती देण्यासाठी ऊस विशेषज्ञ डॉ.एस.एम. पवार, कृषि भूषण पुरस्कार विजेते संजिव माने, माती शास्त्रज्ञ डॉ.फाळके, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जी.जी. खोत तसेच विविध शास्र्ज्ञ शेतकऱ्यांशी खुली चर्चा करतील.
CSR म्हणजेच व्यावसायिक सामाजिक जबाबदारी हा उपक्रम कंपनीच्या वतीने गेली 10 वर्षे देशातील राजस्थान,बिहार,पटना,आंध्र प्रदेश, तमिलनाडु यासह अनेक राज्यांमधे राबविला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिक उत्पादनात वाढ होऊन त्यांना आर्थिक फायदा झालेला आहे असे जे फार्मचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. के. श्रीनिवासन यांनी सांगितले. या कार्यक्रमात जे फार्मचा मोलाचा वाटा आहे.
आज 10 ते 1 यावेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे जनरल मॅनेजर विक्रम गुजर आणि विनीत जोशी यांनी सांगितले.
Leave a Reply