
कोल्हापूर :मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट हार,तुरे,पुष्पगुच्छ, मशाली,वाजंत्री,व आधुनिक पद्धतीने साजरी होणाऱ्या शिव जयंतीवरील ख़र्चाचा विनियोग योग्य पद्धतीने करत नँशनल ब्लँक पँथर पार्टीमार्फत आज शेंडा पार्क येथील कुष्ठधाम येथे असणारे कुष्ठरोगी हे कौटुंबीक व सामाजीक सुविधेपासुन कित्येक वर्षे वंचीत आहेत. त्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्याचा पाठपुरावा शासन स्तरावर करण्याचे वचन देऊन सोबत अन्नदान करून शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.समाजाने याचा आदर्श घेणे गरजेचे आहे. त्यावेळी डॉ सुनिल पाटील,अमित पावले,उमेश चांदणे,जिवन सिंग,राहुल कांबळे व रूग्ण उपस्थीत होते.
Leave a Reply