
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज शिवजयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. विद्यापीठ प्रांगणातील भव्य शिवपुतळ्यासही पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी संगीत अधिविभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत सादर केले. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply