कोरोना काळानंतर कागल बोटिंग क्लब पुन्हा सुरू     

 

कागल:कोरोना संसर्गाच्या महामारी मुळे गेले वर्षभर बंद असलेल्या कागल बोटिंग क्लबने कोरोना काळानंतर कात टाकली आहे. बोटिंग क्लबच्या बोटींचे जलावतरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनीही बोटिंगचा आनंद लुटला.यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे गेले वर्षभर बोटिंग क्लब, जिम, लॉजिंग, हॉटेल्स, स्विमिंग टॅंक अशा सर्वच व्यवस्था बंद होत्या. दरम्यान; कागलचा बोटिंग क्लब पूर्ववत सुरू करा,  अशी पर्यटकांची आग्रही मागणी होती. हा बोटिंग क्लब पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटन केंद्र व्हावे, म्हणून येथे  नव्याने बाग – बगीचा, खाउगल्ली, ऑक्सिजनचे रंगीत कारंजे, म्युझिकल फाउंटेन, आणि लेसर शो इत्यादी सुविधा सीएसआर फंडामधून उभारल्या जातील. बोटिंग क्लबसह श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव या दोन्हीही ठिकाणी ओपन जिम उभारल्या जातील, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.यावेळी कोल्हापूरचे माजी महापौर आर के जिल्हा बँक संचालक प्रताप उर्फ भय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, रमेश माळी, चंद्रकांत गवळी, बाबासो नाईक, नितीन दिंडे, आनंदा पसारे, सतीश घाडगे, विवेक लोटे, माधवी मोरबाळे, अलका मर्दाने, शोभा लाड, पद्मजा भालबर, शाहिन अत्तार, रंजना सनगर, सागर गुरव, नवाज मुश्रीफ, व्यवस्थापक अशकिन आजरेकर,  संदीप कवाळे, आदिल फरास , आदी प्रमुख उपस्थित होते.आभार कागल नगर परिषदेचे पक्षप्रतोद नितीन दिंडे यांनी मानले.
       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!