
कोल्हापूर/ प्रतिनिधी: डॉक्टरांनी अत्यावश्यक परिस्थितीत त्याचप्रमाणे आवश्यक ठिकाणी रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा देण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन बदल तसेच आधुनिक व प्रगतीशील तंत्रज्ञान येत आहे. याचा फायदा रुग्णांना लगेचच होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बेळगावच्या केएलई विद्यापीठाचे कुलपती आणि केएलई सोसायटीचे अध्यक्ष व तज्ञ डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले.कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (शाखा इंडियन मेडिकल असोसिएशन)च्यावतीने आयोजित केएमए-२०२१ या दोन दिवसीय वार्षिक वैद्यकीय परिषदेदरम्यान ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कोल्हापूर जिल्ह्यात आलेली पूर परिस्थिती आणि कोरोनाची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली याबद्दल कोल्हापूरच्या डॉक्टरांचे डॉ.कोरे यांनी कौतुक केले.
ऑनलाईन पद्धतीने त्यांनी उपस्थित तज्ञ डॉक्टर्सना मार्गदर्शन केले.
कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करत ही वैद्यकीय परिषद मोजक्या डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडली. पण परिषदेमध्ये संपूर्ण जगभरातून तब्बल पाच हजाराहून अधिक तज्ञ डॉक्टर्स ऑनलाइन सहभागी झाले होते. पद्मश्री प्राप्त सुप्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ.अमित मायदेव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना काळात कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टर सदस्यांचे खूप मोठे योगदान आहे. इथून पुढेही प्रशासनास सहकार्य करण्यात व लसीकरणाच्या टप्प्यांसाठी आम्ही सज्ज आहोत. या वैद्यकीय परिषदेमुळे डॉक्टरांमधील ज्ञान वृद्धिंगत होऊन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल असा उद्देश कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के यांनी विशद केला.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून परिषदेचे निरीक्षक डॉ. पी.एम.चौगुले, डॉ. संदीप कदम यांनी केले.
परिषदेचे अध्यक्ष डॉ. साईप्रसाद यांनी प्रास्ताविक केले.परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.ए.बी. पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.परिषदेचे सचिव डॉ.शैलेश कोरे यांनी आभार मानले.
परिषदेत ‘३७ वर्षातील कारकीर्द व संस्थेची निर्मिती’ या बद्दल कोल्हापुरातील सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.अशोक भूपाळी यांना डॉ. अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.परिषदेत प्रबंध वाचन व कोरोना
वरील पोस्टर्सचे सादरीकरण करण्यात आले. यासाठी परीक्षक म्हणून डॉ.अमोल कोडोलीकर व डॉ.विनय वाघ यांनी काम पाहिले. यावेळी डॉ. सतीश खाडिलकर, डॉ.जॉन टी. जॉन, डॉ.वासीम काझी, डॉ. कुणाल पाटील, डॉ. सुधाकर जाधव, डॉ.दिनेश कित्तुर, डॉ.मोहन मगदूम, डॉ. निकिता दोशी, डॉ. दीपक पाटील, डॉ. युवराज पवार, डॉ. अविनाश सोनवणे, डॉ. दिपक जोशी, डॉ. सुरज पवार, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच कोल्हापूरातील पहिलेच पेट स्कॅन मशीनचे उद्घाटनही यादरम्यान करण्यात आले. लवकरच हे मशीन सुरू होणार असल्याचे सांगितले.यावेळी मेडिकल असोसिएशनच्या फ्लॅश या नियतकालिकेचे प्रकाशन करण्यात आले. परिषदेस केएमएच्या उपाध्यक्षा डॉ.आशा जाधव, मानद सचिव डॉ. गीता पिल्लई, खजानिस डॉ. शितल देसाई, डॉ.राजेंद्र वायचळ,डॉ. संदीप साळोखे, डॉ. राजेंद्र चिंचणीकर,डॉ.रवींद्र शिंदे,डॉ.किरण दोशी, डॉ.सोपान चौगुले, डॉ.अरुण धुमाळे,डॉ.महावीर मिठारी,डॉ.कपिल शिंदे,डॉ.संजय घोटणे,डॉ.प्रसाद हलकर्णीकर,डॉ.सूर्यकांत मस्कर
डॉ. शीतल पाटील आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ.अमर आडके, डॉ. रूपाली दळवी, डॉ.नीता नरके,डॉ.अरुण देशमुख यांनी केले.
Leave a Reply