करवीर तहसील प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजूर

 

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षापासून करवीर तहसील कार्यालय आणि करवीर पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे या ठिकाणी उभारण्यात येणार्‍या प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आमदार ऋतुराज पाटील यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. आमदार ऋतुराज पाटील यांनी संबंधित सर्व अधिकार्‍यांंची बैठक घेऊन आजूबाजूला असणार्‍या हेरिटेज इमारतींचा समन्वय साधून या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याच्या सूचना केल्या आहेत.भाऊसिंगजी रोड वर असणार्‍या करवीर तहसील कार्यालय व करवीर पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना पार्किंगची समस्या तर होतीच, याशिवाय ही इमारत जुनी झाली असून प्रशासकीय कामासाठी ती अपुरी पडत होती. त्यामुळे या ठिकाणी एक प्रशस्त इमारत व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. याशिवाय करवीर तालुका लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा तालुका मानला जातो. शहरातील उपनगरांचा, ही काही भाग करवीर मध्येे येत असल्याने या कार्यालयाामध्ये येणार्‍या नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे याठिकाणी सुसज्ज इमारत असावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे इमारतीसाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 14 कोटी 98 लाखाचा निधीला मंजूरी दिली आहे. या ठिकाणी पाच मजली इकोफ्रेंडली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यातील दोन मजले पार्किगसाठी असणार आहेत. या इमारतीच्या कामाला प्रशासकीय मान्यताही मिळाली असून कामाचे टेंडर होऊन बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. दरम्यान या इमारतीच्या प्रशासकीय मंजूरी नंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्याच्या संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन सूचना केल्या.करवीर तहसील कार्यालयाच्या शेजारी अनेक हेरिटेज इमारती आहेत. या इमारतींचा समन्वय साधून आणि हेरीटेज इमारतींना शोभेल अशी वास्तू बनवण्याचा सूचना आ पाटील यांनी केली आहे.।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!