
कोल्हापूर: महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता दिल्लीपर्यंत वाजू लागले आहेत. आम आदमी पार्टीचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक हे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित राज्य समितीच्या बैठकीसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत सह-प्रभारी दीपक सिंगला होते. राजगौरव मंगल कार्यालय येथे त्यांचे आगमन झाले. तेथे पक्षाच्या कार्यकर्त्यांद्वारे त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथून दुचाकी रॅलीस सुरुवात होऊन ती रॅली कावळा नाका येथे आली. याठिकाणी पाठक यांनी छत्रपती ताराराणी पुतळ्यास अभिवादन केले. पुढे ठिकठिकाणी शहरातील रिक्षाचालक व भाजी विक्रेत्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथून रॅली उद्यमनगर येथील पक्षाच्या कार्यालयात पोहोचली जिथे पाठक यांनी शहरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले.यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधताना ते म्हणाले की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले विकासाचे दिल्ली मॉडेल हे राजर्षी शाहूंच्या विचारांशी व कृतीकार्यक्रमाशी प्रेरित आहे. जे काम आम्ही दिल्लीत केले तेच आता आम्हाला कोल्हापूरच्या प्रत्येक गल्लीत करायचे असल्याचे यावेळी पाठक
यांनी सांगितले.यावेळी उपस्थित प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे व राज्य समिती सदस्यांच्या हस्ते ‘हे आम्ही करणारच’ या घर-टू-घर प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेद्वारे पक्षाच्या अजेंड्यावर असणाऱ्या 6 मुद्द्यांना घेऊन पक्षाचे कार्यकर्ते सर्व 81 प्रभागांमध्ये घरोघरी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किशोर मंध्यान, राज्य सचिव धनंजय शिंदे व इतर राज्य समिती सदस्य उपस्थित होते.तसेच जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, सुनील मोरे, श्रेया हेगडे, विजय हेगडे, पल्लवी पाटील,राज कोरगांवकर,आदम शेख, प्रथमेश सुर्यवंशी, राकेश गायकवाड, बाबुराव बाजारी,भाग्यवंत डाफळे, महेश घोलपे,लाला बिर्जे,बसवराज हदीमनी, विशाल वाठारे, वैशाली कदम, पौर्णिमा निंबाळकर, गणेश सकटे, गिरीश पाटील, अभिजित भोसले, दत्तात्रय सुतार,बाबूराव तोरसकर,विनोद नल्लवडे,देवराज चव्हाण,आदी उपस्थित होते.
Leave a Reply