गडहिंग्लजच्या झोपडपट्टीधारकांचा प्रश्न तातडीने निकालात काढा:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 

गडहिंगलज:गडहिंग्लज शहरातील झोपडपट्टी धारकांच्या नियमितीकरणाचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत तातडीने निकाली काढा, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गडहिंग्लज येथील शासकीय विश्रामगृहावर ही बैठक झाली.प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे व गडिंग्लज नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेंद्र मुतकेकर या अधिकाऱ्यांना झोपडपट्टी धारकांची तातडीने बैठक घेऊन त्यांचे नियमितीकरणासह सर्वच प्रश्न निकालात काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.यावेळी दुडगा मार्ग, शेंद्री रोड, मेटाचा मार्ग, लाखेनगर डवरी वसाहत, ईराणी वसाहत या झोपडपट्ट्यांमधील झोपडपट्टी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नगरसेविका श्रीमंती शुभदा पाटील, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, सिद्धार्थ बन्ने, सुरेश म्हेत्री,  इक्बाल नायकवडी, हरुण सय्यद, अमर म्हेत्री, विनायक डोनवाडे,  विकास पोवार, पुनम म्हेत्री, गंगाराम माकडवाले, माधवी जाधव, भरत कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!