
कोल्हापूर /प्रतिनिधी: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. या अंतर्गत पिंग पोंग एंटरटेनमेंट चॅनेलच्यावतीने ‘बिंबा’ या वेबसीरीज ची निर्मिती करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात या वेबसीरिजचे बहुतांश शूटिंग पूर्ण झालं असून 30 मार्चला आहे शूटिंग संपणार आहे. तसेच बाकीचे शूटिंग सातारा व पुणे जिल्ह्यात पूर्ण झाले आहे. ही वेबसिरीज प्रणय,भय,थरार अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी असणार आहे. सहा भागांमध्ये ही वेबसिरीज प्रदर्शित होणार असून उत्कृष्ट कथानक, गुणवत्तापूर्वक दिग्दर्शन व कसदार कलाकारांच्या अभिनयामुळे या वेबसिरीजला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळेल, असा विश्वास वेबसिरीजचे दिग्दर्शक मिलिंद संकपाळ आणि निर्माते जीवन जाधव, भरत कालेता यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. मुंबईच्या कामरुपा क्रिएशनच्या वतीने ‘बिंबा’ हि वेबसिरीज बनवण्यात येत आहे. या वेबसिरीजचे लेखन राहुल डोर्ले यांनी केले आहे. तर प्रसिद्ध नायक अनिकेत विश्वासराव आणि युविका चौधरी यांच्या यामध्ये प्रमुख भूमिका असून राहुल सिंग हे विशेष भूमिकेत आहेत. त्या वेबसिरीजचे शूटिंग निशांत भागवत यांनी केलं आहे. ही वेबसिरीज एका मानसिक विकृत तरुणाच्या कारनाम्यावर आधारित आहे. बिंबा हे संस्कृत नाव असून याचा अर्थ गिरगिट म्हणजेच रंग बदलणारा सरडा याच संकल्पनेवर आधारित या वेबसीरिज कथानक असणार आहे. किंवा याला सायको थ्रिलर पट असेही म्हणता येईल, असे दिग्दर्शक मिलिंद संकपाळ यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला बिंबा वेबसिरीजचे सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.
Leave a Reply