
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सदस्याच्या नियुक्त्या आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर सौ.अश्विनी रामाणे यांनी केल्या.
यामध्ये कॉग्रेस विकास आघाडीतर्फे नगसेविका सौ.स्वाती यवलुजे, सौ.सुरेखा शहा, नगरसेवक राहूल माने, ताराराणी आघाडी पक्षातर्फे नगरसेविका सौ.सविता घोरपडे, सौ.पुजा नाईकनवरे, नॅशनॅलीस्ट कॉग्रेस पार्टीतर्फे नगरसेवक अजिंक्य चव्हाण, महेश सावंत तर भारतीय जनता पक्ष व मित्र आघाडीतर्फे नगरसेविका सौ.भाग्यश्री शेटके व नगरसेवक राजू दिडोर्ले यांची नियुक्ती केली.
सदरची नांवे महापालिकेच्या संबधीत गटनेत्यांनी महापौर सौ.अिानी रामाणे यांच्याकडे दिली होती. या नांवावर आज झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.
Leave a Reply