कोल्हापूर : इंडियन फिल्म स्टुडिओ प्रस्तुत Mr.&Mrs.सदाचारी हा एक्शन अणि रोमांटिकचा मिलाप असणारा मराठी चित्रपट येत्या 19 फेब्रुवारी ला प्रदर्शित होत आहे. कोल्हापूर सह मॉरेशिस मधेही या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटातील जगदंब हे गाणे सध्या खुप गाजत आहे.उत्पल आचार्य यांची निर्मिति असलेल्या या चित्रपटात वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे,मोहन जोशी,उदय नेने या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. माझी वेगळी भूमिका यात प्रेक्षकां ना पहायला मिळणार आहे असे वैभव तत्ववादी याने सांगितले.सर्व बाजूने एक परिपूर्ण मसाला मुव्ही म्हणून प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल असा विश्वास दिग्दर्शक आशीष वाघ यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस चित्रपटाची सम्पूर्ण टीम उपस्थित होती.

Leave a Reply