महापालिकेच्यावतीने आज पल्स पोलीओ लसीकरण मोहिम

 

IMG_20160115_231730कोल्हापूर :महानगरपालिकेच्यावतीने कोल्हापूर शहरामध्ये आज (रविवारी) दुसऱ्या सत्रातील पल्स पोलीओ लसीकरण मोहिम सकाळी 8 ते 5 या वेळेत राबविण्यात येणार आहे. शहरातील 172 लसीकरण केंद्रांवर 0 ते 5 वर्षापर्यंतच्या 47 हजार 523 बालकांना डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पहिल्या सत्रामध्ये दि.18 जानेवारी रोजी आयोजित लसीकरण मोहिमेमध्ये 47,523 बालकांपैकी 41,873 इतक्या बालकांना पोलिओचे डोस पाजणेत आले होते. या दिवशी ज्या बालकांनी पोलिओ डोस घेतले नव्हते त्या बालकांना 18 ते 22 जानेवारी 2016 रोजीपर्यंत घरभेटी माध्यमातून शोध घेऊन डोस पाजणेत आले आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यभर पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत शहरातील 172 लसीकरण केंद्रावर राबविण्यात येणार आहे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा कार्यरत झालेली असून 172 बुथमधून 509 कर्मचारी आणि 710 स्वयंसेवक असे एकूण 1219 कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहिम पार पाडली जाणार आहे दुसऱ्या सत्रातील पल्स पोलीओ लसीकरण मोहिम सकाळी 8 ते 5 या वेळेत राबविण्यात येणार आहे. शहरातील 172 लसीकरण केंद्रांवर 0 ते 5 वर्षापर्यंतच्या 47 हजार 523 बालकांना डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पहिल्या सत्रामध्ये दि.18 जानेवारी रोजी आयोजित लसीकरण मोहिमेमध्ये 47,523 बालकांपैकी 41,873 इतक्या बालकांना पोलिओचे डोस पाजणेत आले होते. या दिवशी ज्या बालकांनी पोलिओ डोस घेतले नव्हते त्या बालकांना 18 ते 22 जानेवारी 2016 रोजीपर्यंत घरभेटी माध्यमातून शोध घेऊन डोस पाजणेत आले आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यभर पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत आज रविवार दि.21 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत शहरातील 172 लसीकरण केंद्रावर राबविण्यात येणार आहे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा कार्यरत झालेली असून 172 बुथमधून 509 कर्मचारी आणि 710 स्वयंसेवक असे एकूण 1219 कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहिम पार पाडली जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!