
कोल्हापूर : शहरातील पाणीपुरवठ्याच्या दुरावस्थेसंदर्भात आज भाजपा शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली आणि कोल्हापूरच्या पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, पाण्याचा किती उपसा होतो आणि बिलिंग किती होते, सांडपाणी अधिभार जमा किती व त्या अधिभाराचा नेमका कोणत्या कोणत्या कारणा करीत व किती वापर झाला तसेच काळम्मा वाडी थेट पाईपलाईन योजनेची सद्यस्थिती आणि ती नेमकी पूर्ण कधी होणार या विषयांवर नागरिकांत समभ्रम असून महानगरपालिकेने या विषयाची श्वेतपत्रिका लवकरात लवकर प्रसिद्ध करावी अशी मागणी केली.महानगरपालिकेची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना सर्व सामान्य नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या प्राथमिक गरजांच्या बाबतीत महापालिका प्रशासन अत्यंत तोकडे पडत आहे असे दिसून येते. स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठ्याच्या बाबतीत तर महापालिका प्रशासनाची अत्यंत दयनीय अवस्था आहे.
भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी प्रस्तावना करताना शहातील पाण्याच्या व्यवस्थे बाबतची सद्यस्थिती विषद केली. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना झाल्या नंतर बालिंगा उपसा केंद्रातून कोल्हापूरकरांची तहान भागवली जात होती त्यांनतर १९९५ साली शिंगणापूर योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले. आज पर्यंत या दोन्ही योजनांच्या माध्यमातून अपुऱ्या दाबाने संपूर्ण कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. उपसा केलेल्या पाण्यातून रोज ४ लाख लिटर पाणी गळती द्वारे वाहून जाते परंतु पाणी पुरवठा विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे याकडे लक्ष नसल्याचे नमूद केले. कोल्हापूर शहरातील ड्रेनेज लाइन व पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाइन बदलण्यासाठी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अमृत योजने अंतर्गत १७० कोटीचा निधी मंजूर केला तरी देखील अजूनही वर उपस्थित केलेले प्रश्न का प्रलंबित आहेत याचा विचार होणे गरजेचे असल्याचे सांगतले.
माजी नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, २०१२ साली मंजूर झालेली काळंम्मावाडी थेट पाईप लाईनेचे काम अतीशय धीम्या गतीने हे काम चालू असून थेट पाईपलाईन योजना पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकता आहे. कोल्हापूर महानगरपालिका जलव्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शहरामध्ये तयार होणाऱ्या सांड पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाण्याच्या बीलामध्ये “सांडपाणी अधिभार कर” लावला परंतु यातून शहर वासियांच्या खिशातून किती रुपये घेतले व किती ठिकाणी या सांडपाण्यावर प्रकिया करणारे प्रकल्प उभारले गेले याची कोणती माहिती आहे असा सवाल उपस्थित केला. तसेच काही अधिकारी, कर्मचारी व माजी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने शहरात शेकडोंच्या संख्येने बिनमिटरची कनेक्शन असून ती प्रशासनाने तातडीने शोधावीत असे सांगितले.
Leave a Reply