कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोल्हापूर शहरात प्रशासनाच्यावतीने रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. यासंदर्भात आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सादर केले.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीचे फार मोठे संकट दिसत नसतानाही महाराष्ट्र राज्य सरकारने घोषीत केलेल्या रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत कडक निर्बंध लादण्याचे कारणच काय ? उष्मा वाढत असताना सर्व सामान्य नागरीक स्वत:च्या घरासाठी लागणारी खरेदी करण्यासाठी संध्याकाळीच बाहेर पडतात परंतु रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी आपल्या प्रशासनाकडून फार मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. यातून समाजातील सर्वच घटकातील असंतोष वाढत चालला आहे.
प्रास्ताविक करताना सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी कोल्हापूर शहरातील छोटे व्यवसायीक, फेरीवाले यांची व्यवसायाबद्दल असलेली भूमिका स्पष्ट केली.

Leave a Reply