
कोल्हापूर : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने दिल्लीमधे 35 वर्षपूर्ती च्या निमित्ताने 11ते 13 मार्च दरम्यान विश्व संस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. यासाठी कोल्हापूरा तुन 1 हजार धनगर बांधव एकाच वेळी ढोल वाजवून आपल्या कलेची प्रस्तुती करणार आहेत. दिल्ली मधे 11 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर उद्घाटन प्रसंगी हा कलेचा अविष्कार सादर होणार आहे. महाराष्ट्रा ला हा बहुमान मिळाला आहे. याचीच पूर्व तयारी म्हणून आज पोलिस ग्राउंड येथे सराव केला. एका वेळी 1008 धनगरी ढोल वादकांनी यात सहभाग घेतला.
दिल्लीमधे 11 मार्च ला सायंकाळी 5 वाजता सलग 7 मिनिटे ढोल वादनाचा हा अभूतपुर्व सोहळा होणार आहे. यासाठी मानसिंग जाधव, प्रशांत पाटील, पद्मनाभ देशपांडे, जलराज जाधव हे गेले 2 महीने परिश्रम घेत आहेत. कलकारांचा पोशाख गोल्ड विंग फाउंडेशने, तसेच श्री श्री बिल्डर्स चे विजय आणि निखिल अगरवाल यांचे सहकार्य लाभले आहे. सौ. राजश्री भोसले, डिंपल गजवाणी, समन्वयक विनायक मुरदंडे, शेखर मुंदडा मंदीर चव्हाण यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर मधून 3 हजार आणि महाराष्ट्रातून 20 हजार पेक्षा जास्त लोकांनी नाव नोंदणी केली आहे.
Leave a Reply