
कोल्हापूर : प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कोल्हापूर केंद्रास 40 वर्षे पूर्ण होत आहेत त्याचप्रमाणे विश्व शांती आणि समृद्धिसाठी स्वच्छ भारत अभियांन्तर्गत विश्वशांती आणि समृद्धीसाठी विश्वविक्रमी मास मेडीटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात ४० हजाराहून अधिक बंधू आणि भगिनी सामुदायिकपणे 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत गांधी मैदान येथे योग करणार आहेत.याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये होणार आहे. सलग १५ मिनिटे हि योग साधना होणार आहे असे ब्र.कु.सुनंदा बेहेनजी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कार्यक्रम ब्रह्माकुमारीच्या सहप्रशासिका दादी रतनमोहीनीजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील,पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ,विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत्त संपन्न होणार आहे.असेही त्या म्हणाल्या.
आता पर्यंत ३७ हजारहून अधिक नोंदणी झाली आहे तरी ज्यांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी विद्यालयाच्या कार्यालयात किंवा ०२३१-२६२९४२१,९७६६५८१७७५,९८२२०७४७४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास राजयोगिनी ब्र.कु.संतोष दादीजी प्रमुख वक्त्या असणार आहेत.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत्त सध्याच्या जगात मानसिक स्थिरता ,शांती,परस्पर स्नेहभाव यांची वाढ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या योगाचा विश्विक्रम होणार आहे.तरी या अभूतपूर्व सोहळ्यास जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply