
कोल्हापूर : गोकुळच्या प्रोटोकॉलप्रमाणे निवडणुकीमुळे संघाची आज शेवटची बोर्ड मिटिंग, कार्यकाल यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व संचालकांचा सत्कार, परुंतु यामध्ये ज्यांनी चुयेकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ४६ वर्षे काम केले. त्यांची आज खऱ्या अर्थाने शेवटची मिटिंग कारण त्यांनी या निवडणूकीमधून माघार घेतली आहे. सुरवात तर सगळेच करतात पण कुठे थांबायचे हे ज्यांला कळते.तोच जीवनात यशस्वी होतो. आणि योग्यवेळी मी थांबत आहे असे भावूक उद्गार संघाचे जेष्ठ संचालक अरुण नरके यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.आसपासच्या जिल्ह्यात किंवा राज्यात सहकाराची अवस्था बिकट असताना गोकुळ मात्र दीपस्तंभाप्रमाने उभा आहे. डॉ.वर्गिस कुरीयन यांच्या स्वप्नातला दुग्ध व्यवसाय गोकुळने साकारला असून त्याचे खरे श्रेय हे सर्व संचालक, दूध उत्पादक, संघ कर्मचारी व सहकारचे हितचिंतक यांना जाते असे उद्गार कार्यकारी संचालक श्री.डी.व्ही.घाणेकर यांनी यावेळी काढले.यावेळी बोलताना जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांना अश्रू अनावर झाले. ज्यांच्या सोबत ४३ वर्षे काम केले ते इथून पुढे मार्गदर्शक म्हणून काम करतील तसेच चेतन नरके यांच्या रूपाने नवीन आश्वासक वारसा नरके साहेबांनी दिला आहे. आनंदराव पाटील चुयेकर यांनी लावलेल्या या रोपट्याचे डेरेदार वृक्षामध्ये रूपांतर हे नरके साहेबांच्या कुशाग्र बुद्धी व दूर दृष्टीतून साकारल्याचे गौरव उद्गार जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांनी काढले.संघाचे चेअरमन रविंद्र आपटे यांना आपले मनोगत व्यक्त करताना. संघाचे कामकाज हे राजकारण विरहीत राहिले असून आजपर्यंत १४ राष्ट्रीय पुरस्कार तसेच विविध क्षेत्रामधील उच्च व्यक्तींनी गोकुळ बद्दल गौरवउद्गार काढले आहेत. जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ बद्दल काही राजकीय व्यक्ती वक्रदृष्टी ठेवून असून त्यांच्यापासून गोकुळला वाचवायचे असेल तर सर्वांनी येणा-या निवडणूकीमध्ये एकञ येवून गोकुळचे संरक्षण करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन चेअरमन रविंद्र आपटे यांनी केले.संघ सेवेतुन निवृत्त झालेबद्दल असि.ऑफीसर विजय दरेकर, ऑपरेटर सदाशिव पाटील, कामगार विलास चौगुले व क्लार्क रंगराव बोडके यांचा सत्कार करणेत आला.यावेळी संचालक विश्वास जाधव, बाळासाहेब खाडे, दिपक पाटील, सत्यजित पाटील, बाबा देसाई, विलास कांबळे, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणकेर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील,डेअरी मॅनेजर चौधरी, जनसंपर्क अधिकारी पी.आर.पाटील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply