आ.चंद्रकांत जाधव यांच्याकडून पोलीसांना तीन हजार एन९५ मास्क वाटप

 

कोल्हापूर: जनता सुरक्षित राहावी, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून झटणारे पोलिसांचे हात कोरोना काळात लोकांच्या सुरक्षिततेसाठी पुढे आलेते. पोलीसांनी बेशिस्तांना शिस्त लावण्याचे काम केल्याने अनेकजण कोरोनापासून सुरक्षित राहिलेत, अशा पोलिस प्रशासनाच्या सुरक्षिततेसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मास्क वाटपाचा राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे असे गौरवउद्गार जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केले.
शहर-जिल्ह्यात कोरोना वाढू नये, समाजातील प्रत्येक घटक कोरोनापासून सुरक्षित राहावा, या हेतूने मागील वर्षभरापासून पोलिस रात्रंदिवस रस्त्यांवर खडा पहारा देत आहेत. या काळात अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. तरीही त्यांनी “सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदाला जागून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या पोलीसांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, हे जाणून आमदार चंद्रकांत जाधव यांच्यावतीने पोलीसांना तीन हजार एन ९५ मास्कचे वाटप करण्यात आले.
आमदार चंद्रकांत जाधव यांचे चिरंजीव सत्यजीत जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे,चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव धनंजय दुग्गे, उदय जाधव यांच्यहस्ते जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे व शहरातील सर्व पोलीस ठाण्यात मास्कचे वाटप करण्यात आले.
राजारामपूरी पोलीस ठाणेत पोलीस निरीक्षक सिताराम डूबल, शाहूपूरी पोलीस ठाणेत पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील, करवीर पोलीस ठाणेत पोलीस निरीक्षक संदिप कोळेकर, जुना राजवाडा पोलीस ठाणेत पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणेत पोलीस निरीक्षक सतिश होडगर, शहर वाहतुक नियंत्रण शाखेत पोलीस उपनिरीक्षक मधुकर चौगुले यांच्याकडे मास्क देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!