
कोल्हापूरः जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचले सत्तारूढचे संभाव्य उमेदवार ठरावधारकांचा पण चांगला प्रतिसाद.पॅनेल निश्चितीसाठी काहीच दिवस उरले असताना सत्तारूढ गटाच्या उमेदवारांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ठराव धारकांशी सरळ संपर्क साधत आपली भूमिका, गोकुळचे कार्य व भविष्यातील गोकुळची धोरणे याबद्दल माहिती देत प्रचारात आघाडी घेतली. विशेष म्हणजे सत्तारूढ यावेळी “राजर्षि शाहू आघाडी” या नावाने पॅनेल करत असून सर्व संभाव्य उमेदवार एकत्रीत प्रचार करताना दिसत आहेत.या उलट विरोधी आघाडीमध्ये गोंधळाचे वातावरण दिसत असून प्रत्येक उमेदवाराचा वैयक्तिक प्रचार चालू असलेचे दिसते.सत्तारूढ आघाडी आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत असून प्रत्येकास व्यक्तिगत जबाबदारी दिलेली आहे, त्याप्रमाणे सर्वजन प्रचारात कार्यरत आहेत.चेअरमन रविंद्र आपटे यांचे प्रतिनिधी म्हणून यामध्ये जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, विश्वासराव जाधव, धैर्यशिल देसाई, दिपक पाटील, पी.डी. धुंदरे, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, अमरिसिंह घाटगे, सत्यजित पाटील, सदानंद हत्तरकी, चेतन नरके, अनुराधा पाटील, शौमिका महाडिक इत्यादींनी सहभाग घेतला असून चेअरमन रविंद्र आपटे आजारीपणात विश्रांतीमुळे मिडीयाच्या माध्यमातुन ठरावधारकांच्या संपर्कात आहेत.
Leave a Reply