कोरोना नियंत्रणासाठी ‘केएमए- आयएमए कोविड टास्क फोर्स’

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज व सतर्क राहणे आवश्यक आहे. अचानक रुग्ण संख्या वाढली तर बेड्स,ऑक्सिजन, औषधांची कमतरता भासू नये यासाठी कोल्हापुरातील वैद्यकीय संस्थांची शिखर संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, फना, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा),होमिओपॅथी
असोसिएशन(निहा), आयुर्वेद व्यासपीठ संघटना आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए) या सर्व वैद्यकीय संघटना यांनी कोरोना लढाईत वज्रमूठ बांधली असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्स म्हणजे विशेष यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव, सचिव डॉ. किरण दोशी, खजानिस डॉ. ए. बी. पाटील,डॉ. अमर आडके, फना संघटनेचे अध्यक्ष डॉ. भरत कोटकर,सचिव डॉ. अभिजीत तगारे,निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.मुकुंद मोकाशी,सचिव डॉ. राजेंद्र वायचळ, जनरल प्रॅक्टिशनर्सच्या अध्यक्षा डॉ.उषा निंबाळकर,सचिव डॉ.महादेव जोगदंडे, निहा संघटनेचे अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन जगताप,सचिव डॉ. तुषार पांडव यांनी याबद्दलचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व वैद्यकीय संघटना एकत्रित येऊन यात पुढाकार घेतला याबद्दल जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.तसेच ज्यांना या कार्यात सहभागी व्हायची इच्छा आहे असे डॉक्टर, नर्सेस,वैद्यकीय कर्मचारी यांनी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनशी किंवा अध्यक्षा डॉ.आशा जाधव 9422044880 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.आशा जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!