कोरोना लसीचे दररोज पन्नास हजार डोस द्या :आम.चंद्रकांत जाधव

 

कोल्हापूर शहर व जिल्हयासाठी कोरोना लसीचे दररोज पन्नास हजार डोस द्यावेत अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कोरोनाचा संसर्ग जिल्हयात मोठ्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बध कडक कलेत, तरी कोल्हापूर शहर व जिल्हयातील कोरोना रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे. एकीकडे कोल्हापूर कोरोना संसर्गाचा मुकाबला करत असताना. दुसरीकडे कोरोना विरोधातील लढाईत ढाल बनलेल्या कोरोनाविरोधी लशीचा शहर व जिल्हात तुटवडा जाणवू लागला आहे.कोल्हापूर शहरात दररोज पाच हजार तर जिल्हयात दररोज ४५ हजार कोरोना लस डोसची मागणी असताना केवळ २२ ते ३० हजार कोरोना लसीचे डोस उपलब्ध होत आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच दररोज २० ते ३० हजार लोकांना लस न घेता परतावे लागत आहे. अत्यंत वेगाने पसरणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण सर्वांत प्रभावी उपाय आहे. तरी शहरासाठी ५ हजार तर जिल्हयासाठी ४५ हजार असे ५० हजार लसीचे डोस उपलब्ध करुन दयावेत अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!