
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ(गोकुळ) निवडणुकीसाठी २ मे रोजी मतदान होत असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (मंगळवार) अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीच्या पॅनेलची घोषणा ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक, आ.पी.एन. पाटील, माजी खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केली.यातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. शेतकऱ्यांच हित बघणारे हे सत्तारूढ पॅनल पुन्हा निवडून आल्यास गोकुळ ला उंच शिखरावर नेऊन ठेवू असे मत सर्व सत्तारूढ नेत्यांनी व्यक्त केले.
उमेदवारांची नांवे पुढीलप्रमाणे –
सर्वसाधारण गटातून रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, दीपक पाटील, धैर्यशील देसाई, बाळासाहेब खाडे, अमरीश घाटगे, सत्यजित पाटील, सदानंद हत्तरगी, चेतन नरके, धनाजी देसाई, प्रकाश चव्हाण, प्रतापसिंह पाटील, भाटले राजाराम, रणजित पाटील, उदय पाटील, रवीश पाटील, विश्वास जाधव, पी.डी धुंदरे, शौमिका महाडिक, अनुराधा पाटील, अनुसूचित जातीतून विलास कांबळे,
Leave a Reply