
कोल्हापूर: गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या आवारातील कै. आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या सर्व उमेदवारांनी अभिवादन केले. सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी कै. चुयेकर यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा निश्चय सर्व उमेदवारांनी केला.गोकुळच्या निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा आज झाली. यानंतर, सर्व उमेदवारांनी एकत्रितपणे जाऊन कै. चुयेकर यांना अभिवादन केले. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील (आबाजी) यांनी यावेळी सांगितले की, आनंदराव पाटील चुयेकर यांनी मोठ्या कष्ठातून गोकुळची स्थापना केली. सर्वसामान्य दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांनी संघाचा कारभार केला. त्यांच्या या कामाचा आदर्श घेऊन आम्ही यापुढे ही कार्यरत राहू.माजी अध्यक्ष अरुण डोंगळे,आ. राजेश पाटील यांनी कै. चुयेकर यांच्या कामाचा गौरव केला. यावेळी, नाविद मुश्रीफ, विरेंद्र मंडलिक, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील (चुयेकर), बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील ( एस.आर.), रणजित कृष्णराव (के.पी.) पाटील, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, विद्याधर गुरबे, महाबळेश्वर चौगले, अजित नरके, करणसिंह गायकवाड, प्रा. किसन चौगले, सुश्मिता राजेश पाटील, श्रीमती अंजना रेडेकर, अमर यशवंत पाटील, बयाजी शेळके, डॉ. सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply