
कोल्हापूर/प्रतिनिधी: दक्षिण कोरिया येथील वर्ल्ड तायकांदो हेडक्वार्टर्स यांच्या मान्यतेने जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या तायकांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत कोल्हापूरचा जालनावाला स्पोर्ट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरच्या सात खेळाडूंनी यश संपादन केले आहे. या खेळाडूंमध्ये
चिन्मय चव्हाण (फर्स्ट दान ब्लॅक बेल्ट)
ओम कुलकर्णी (सेकंड पुम दान ब्लॅक बेल्ट)
जानवी माने, राजलक्ष्मी अवघडे, रोहन पिसाळ, ऋतुराज माने (सेकंड दान ब्लॅक बेल्ट)
ऋषिकेश इटर्गी (थर्ड दान ब्लॅक बेल्ट)
या खेळाडूंनी ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये आपली चमकदार कामगिरी दर्शवली. वरील खेळाडूंना कोल्हापुरातील जेएसटीएआरसी केंद्राचे मुख्य प्रशिक्षक मास्टर अमोल भोसले तसेच सीईओ ग्रँडमास्टर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Leave a Reply