

महापालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील 52 ठिकाणे नो हॉकर्स झोन म्हणून घोषीत केली आहेत. या ठिकाणी कोणत्याही फेरीवाल्यास व्यवसाय करता येणार नाही. तसेच 74 हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणीच फेरीवाल्यांनी व्यवसाय करण्याचा आहे.
याअंतर्गत आज गांधी मैदान विभागीय कार्यालयाअंतर्गत शेंडा पार्क ते जवाहरनगर रोड, बोंद्रेनगर रिंगरोड या रस्त्यावर पट्टे मारणेचे काम करण्यात आले. राजारामपुरी विभागीय कार्यालयाअंतर्गत रेल्वे फाटक, शाहूपुरी पाण्याच्या टाकीशेजारी, पांजरपोळ ओम मंगळ कार्यालय या ठिकाणी पट्टे मारणेत आले. छ.शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाअंतर्गत दसरा चौक स्टेट बँकेजवळ, अयोध्या टॉकीज जवळील भिमा वस्त्रम पिछाडीस पट्टे आखणेची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई संबधीत विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली
Leave a Reply