ट्रॉली खाली सापडून दोन विद्यार्थी जागीच ठार

 

कोल्हापूर :20160223_171829-BlendCollageउसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून दोन विद्यार्थी जागीच ठार झालेत कोल्हापुरातील गगनबावडा तालुक्यातील तिसंगी गाववजवळ हि घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

कोल्हापूर-गगनबावडा रोडवर तिसंगी गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रकटर आणि सायकलच्या झालेल्या अपघातात 2 शाळकरी विध्यर्थी जागीच ठार झालेत. आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास शाळेतून सायकल वरून घरी परतत असताना हा अपघात झालाय.या अपघातात मृत पावलेले विद्यर्थी हे तिसंगी हायस्कूलचे विद्यार्थी असून अविनाश रंगराव पाटील इयत्ता 7 वी आणि पृथ्वीराज नेताजी सूर्यवंशी इयत्ता 9 वी  अशी त्या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.नेहमी प्रमाणे आज सकाळची शाळा असल्याने हे दोघे विद्यार्थी एकाच सायकल वरून  शाळेला गेले होते शाळेतून परतत असताना हा अपघात झाला  उसाने भरलेल्या ट्रकटर हा उतारावरून हळूहळू येत  होता. याचवेळी ट्रॅक्टर समोरून शाळेतून सायकल वरून डबल शीट येणाऱ्या या शालेय विद्यर्थ्याना सायकल कंट्रोल न झाल्याने हा अपघात झाल्याच सांगण्यात येतं

उसाचा टॅक्टर घेऊन जाणाऱ्या चालकाने मोठ्या आवाजात गाणी लावली असल्याची माहिती पुढे येत आहे त्यामुळे अशा ट्रॅकटर चालकांवर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे

 

कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात या मुलांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे अपघाताचा गृन्हा सीपीआर चौकीत दाखल करण्याच काम सुरु आहे

अद्याप याबाबत कोणाला अटक करण्यात आलेली नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!