कोल्हापूर : प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात आत्तापर्यंत 9 लाख 99 हजार 927 बचत खातेधारकांचे प्रस्ताव विविध बँकांकडे दाखल झाले आहेत, बँकांनी या योजनांबरोबरच अटल विमा योजना आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेचीही जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलताना केली.
बँक ऑफ इंडिया या जिल्हा अंग्रणी बँकेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बॅंक सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एम.जी. कुलकर्णी, रिझर्व बँकेचे सहाय्यक महाप्रंबधक प्रशांत पराते, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांच्यासह सर्व संबधित विभागांचे अधिकारी आणि बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने वीमा संरक्षण देणा-या या महत्वाकांक्षी योजना असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, या वीमा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हयातील सर्व बँकांनी खातेदारांना या योजनेत सहभागी करुन घेण्यात सक्रीय व्हावे. या योजनेच्या लाभापासून एकही बचत खातेदार वंचित राहू नये, या दृष्टीने सर्व बँकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. जिल्हास्तरावर या योजनेची व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टीनेही बँक अधिका-यांनी सकारात्मक प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. जिल्हयात प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून आतापर्यंत प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत 6 लाख 51 हजार 738 बचत खातेधारकांचे तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत 3 लाख 48 हजार 189 बचत खातेधारकांचे प्रस्ताव विविध बँकांकडे दाखल झाले आह

Leave a Reply