
कोल्हापूर- गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय खटल्याची सुनावणी सुरु करू नये अशी मागणी पानसरे कुठुंबीयांच्या वकिलांनी आज कोल्हापूर जिल्हा न्यायालयात केली आहे.आज पासून या खटल्याची सुनावणी प्रत्यक्षात सुरु होणार होती पण आता हा खटला लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसच समीर गायकवाडच कारागृहात गैरवर्तन असल्यान आणि समीरच्या वकिलांनी समीरच्या सुरेशीततेच्या दृष्टीनं व्यक्त केलेल्या चिंतेमुळेच त्याला अंडासेल मध्ये ठेवलं असल्याचं अहवाल कळंबा कारागृह अधिक्षकांनी कोर्टात सादर केलाय. कारागृहाच्या नियम आणि अटीप्रमाणे समीरला कारागृहातील अंडा सेल मधून काही तास बाहेर काढण्यास न्यायालयानं परवानगी दिलीय.आता याबाबत पुढील सुनावणी ८ मार्च ला होणार आहे
Leave a Reply