
राधानगरी:राधानगरी तालुक्यातील गोकुळ दूध संघाचे संलग्न असणाऱ्या दूध संघांना शौमिका अमल महाडिक यांनी भेटी दिल्या. त्या वेळी दूध उत्पादक शेतकरी सभासद आणि ठरावधारक त्यांच्याशी संवाद साधताना आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून एक परिवार तयार झाला आहे. परस्पर विश्वासावर आजवर दूध उत्पादकांनी गोकुळ दूध संघ यांनी यशस्वी वाटचाल केली आहे. या पुढील काळातही हा विश्वास हे नाते आणि ही वाटचाल पुढे घेऊन जायला आम्ही कटिबद्ध आहोत, असा शब्द यावेळी दूध उत्पादक शेतकरी सभासद आणि ठराव धारक यांना दिला.
Leave a Reply