मुंबई – राज्याची सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी राज्य शासन कठोर पावले उचलत आहे. निर्मनुष्य सागरी किनाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
सागरी किनाऱ्यावरील सुरक्षेसंदर्भात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी
फडणवीस बोलत होते. यावेळी उपसभापती वसंत डावखरे, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) प्रा. राम शिंदे, आमदार हुस्नबानो खलिफे, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार भाई गिरकर, गृह विभागाचे सचिव रजनीश शेठ, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे,सचिव यू.के. चव्हाण, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी आदी यावेळी उपस्थित होते. सागरी सुरक्षेसंदर्भात आमदार श्रीमती खलिफे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी विधानपरिषद सभापती श्री. निंबाळकर यांनी यासंदर्भात बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजची बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त श्रीमती शुक्ला यांनी यावेळी सागरी सुरक्षेसंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, सागरी किनाऱ्यावर कोस्टगार्ड, नौदल व राज्याचे पोलीस या यंत्रणा गस्त घालत आहेत. तसेच या तीनही यंत्रणांमध्ये समन्वय राहावा, यासाठी नियमित बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. सागरी किनाऱ्यावर काही ठिकाणे ही निर्मनुष्य आहेत. या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याचा राज्य शासन विचार करत असून या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे अशा ठिकाणांवर नजर ठेवता येणे शक्य होणार आह

Leave a Reply