
कोल्हापूर:रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी डॉक्टरांनी रेडमेसिवीर इंजेक्शनची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडे न करता, प्रशासनाकडे करावी अशी सुचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिली होती. आमदार जाधव यांची सूचना मान्य करत रेडमेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रशासनाकडे करावी असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिलेत. त्यामुळे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मागणीला यश मिळाले आहे.
कोरोना महामारीत जीवनदायी ठरलेल्या रेडमेसिवीर या इंजेक्शनची खुल्या बाजारात विक्री होत नसुन, रुग्णांच्या आवश्यकतेनुसार व रुग्णालयांच्या मागणीनुसार प्रशासनाकडून रेडमेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. असे असतानाही डॉक्टर रेडमेसिवीर इंजेक्शन औषध दुकानातून आणण्याचे पत्र रुग्णांच्या नातेवाईकांना देत होते. डॉक्टरांच्या मागणीमुळे रेडमेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक धावपळ करत होते, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करत होते. लॉकडाऊनच्या काळात रेडमेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकाने फिरवणे योग्य नाही, तसेच यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रेडमेसिवीर इंजेक्शनची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडे न करता, प्रशासनाकडे करावी अशी लेखी सूचना आमदार जाधव यांनी जिल्हाधिकारी देसाई यांना २० एप्रिल रोजी केली होती. त्यानुसार रेडमेसिवीर इंजेक्शनची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडे न करता, प्रशासनाकडे करावी असे आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिलेत. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनबाबत आमदार जाधव यांनी केलेल्या मागणीला यश मिळाले आहे.
Leave a Reply