
कोल्हापूर : कार रेसिंग मधे गो कार्टिंग आणि फॉर्म्युला फोर या रेस प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. अंतरराष्ट्रीय स्तरावर हा क्रीडा प्रकार कौशल्याचा आणि चित्तथरारक आहे. अशा चुरशीच्या स्पर्धेत कृष्णराज महाडिकने अनेकवेळा विजेतेपद मिळविले आहे. गेली 8 वर्षे तो राष्ट्रीय स्तरावर चमक दार कामगिरी करत आहे. गेल्या 3 वर्षापासून कृष्णराज फॉर्म्यूला कार रेसिंगमधे सहभागी होत आहे.दिल्लीमधे झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमधे चैम्पियनशिपमधे त्याने 3 रे स्थान पटकावले. त्याच्या या उज्वल कामगिरीची दखल घेत इंग्लंडमधील रेसिंग प्रमुख प्रसिद्ध ख्रिस डिटमन यांनी कृष्णराजला टीम मधे रेसर म्हणून करारबद्ध केले. ब्रिटिश रेसिंग ड्रायव्हर क्लब मधे त्याचा सहभाग झाला असून तो आता अंतर राष्ट्रीय स्पर्धांमधे सहभागी होत आहे . इंग्लंड मधील रेसिंग ट्रॅक वर ही स्पर्धा एप्रिलमधे होत आहे. या स्पर्धेत कमी पडणार नाही यासाठी खुप मेहनत घेत आहे असे कृष्णराज ने सांगितले.
त्याचा कल रेसिंग कडे होता. आणि त्यात त्याने प्रावीण्य मिळविले आहे यामुळे वडील म्हणून खुप आनंद होत आहे असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. वेग आणि चढाओढ असणाऱ्या या क्रीडा प्रकारात कृष्ण राज ने कोल्हापुरचे नाव उंचावले याचा आनंद आहे आणि आई म्हणून काळजी ही या शब्दात सौ. अरुंधती महाडिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Leave a Reply