कैदी महिलांकडून महालक्ष्मी प्रसादाचे लाडू करुन घेण्यास हिंदूत्ववादी संघटनांचा विरोध

 

कोल्हापूर :कैदी महिलांकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या प्रसादाचे लाडू करुन घेण्यास हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध केला.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा लाडू प्रसाद वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कैदी महिलांकडून  हे लाडू तयार करून घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला हिंदुत्वादी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.भाविकांनी लाडू प्रसादाचे बाजारीकरण न करता मुळचा खडीसाखर, तिळगुळ, फुटण्याचा प्रसाद देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात प्रसादाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांना प्रसाद म्हणून गेल्या काही वर्षांपासून लाडू देण्यात येत आहे.

सध्या खाजगी ठेकेदाराकडून घेण्यात येणारे हे लाडू कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडून तयार करून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच घेतला आहे. यामुळे महिला कैद्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे.कळंबा कारागृहात सध्या 50 महिला कैदी असून त्यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात जेल प्रशासानही सकारात्मक असून त्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने त्यांच्याकडून प्रस्ताव मागवला आहे.जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी मांडलेला प्रस्ताव जरी चांगला असला तरी हिंदुत्वादी संघटनांनी मात्र याला तीव्र विरोध दर्शवला आहे.महिला कैद्याकडून हे लाडू तयार करून घेतले तर ते सात्विक नसणार आहेत. त्यांच्या गुन्हेगारी विचारांचा लाडवामध्ये गुणधर्म उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे हे लाडू पवित्र असू शकणार नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे.IMG_20160224_184155शिवाय या महिला कैदी विविध धर्मांच्या असल्याने हे त्यांच्याकडून देवीच्या प्रसादाचे लाडू त्यांच्याकडून तयार करून घेऊ नयेत असे मत मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!