
कोल्हापूर : प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कोल्हापूर केंद्रास 40 वर्षे पूर्ण होत आहेत त्याचप्रमाणे विश्व शांती आणि समृद्धिसाठी स्वच्छ भारत अभियांन्तर्गत मनःशांतीद्वारे विश्वशांती आणि समृद्धीसाठी विश्वविक्रमी मास मेडीटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यात 25 हजाराहून अधिक बंधू आणि भगिनी सामुदायिकपणे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत गांधी मैदान येथे योग साधना केली.याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली. कार्यक्रमास ब्रह्माकुमारीच्या सहप्रशासिका दादी रतनमोहीनीजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील,डी एस पी प्रदीप देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत्त संपन्न झाला.
कार्यक्रमास राजयोगिनी ब्र.कु.संतोष दादीजी प्रमुख वक्त्या होत्या.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत्त सध्याच्या जगात मानसिक स्थिरता ,शांती,परस्पर स्नेहभाव यांची वाढ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या योगाचा प्रचार आणि प्रसारसाठी हा विश्विक्रम करण्यात आला. या अभूतपूर्व सोहळ्यास 8 हजार शाखांमधुन ब्रह्मा कुमारीचे बंधू आणि भगिनी आले होते. यावेळी 300 लक्ष्मी नारायण वेशभूषेत मिरावणुकीद्वारे सहभागी झाले होते. लवकरच सतयुग येणार आहे असा नारा यावेळी देण्यात आला.यावेळी कोल्हापूर सेंटर च्या सुनंदा बेहनजी, बी के दशरथ भाई यांच्यासह अनुयायी उपस्थित होते.
Leave a Reply