पत्रकारांना सोयी- सुविधा मिळणे गरजेचे : पत्रकार सेवा संघ देणार शासनाला प्रस्ताव

 

IMG_20160224_153119कोल्हापूर : समाजाचा शिक्षक म्हणजे पत्रकार, समाजात काहीही कुठेही एखादी घटना घडली की ती समाजासमोर आणण्यासाठी सतत दक्ष असणारा पत्रकार सममाजाकडून आणि शासनाकडून नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे. समाजाला मार्गदर्शक पण सोयी सुविधांपासून वंचित अशी अवस्था असणारा पत्रकार स्वतःला झोकून देऊन प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून घडणाऱ्या घटनांचे वस्तवदर्शी आणि पारदर्शी प्रतिबिंब आपली वैचारिक क्षमता पणाला लावून आपल्या लेखणी द्वारे समजासमोर आणतो या बदल्यात काही समाज कंटकांकडून त्याच्यावर हल्लेही होतात.

यात त्याच्या जीवावर बेतते, त्यात त्याला कायमचे अधुपण वाट्याला येते.अशी पत्रकारांवर झालेल्या हल्यांची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत.पण याची जबाबदारी तो ज्या प्रसार माध्यमात काम करतो त्या संस्थेचा प्रमुख किंवा शासन कुणीही घेत नाही.पत्रकार इतरांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोड़तो.पण त्याच्यावर येणाऱ्या संकटांचे काय? यासाठी कोल्हापूरातील

सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार आहेत. यासाठी पत्रकार सेवा संघाच्या  माध्यमातून( हा संघ म्हणजे कोल्हापुरतील अनेक पत्रकार संघटनातील एक संघटना नसून अस्तित्वात असलेल्या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन पत्रकारांच्या मागण्या शासनसमोर प्रस्ताव रूपाने ठेऊन त्याचा पाठ पुरावा  या संघाच्यावतीने करण्यात येणार आहे.याची कृपया नोंद घ्यावी) करण्यात येणार आहे.त्याची पहिली बैठक घेण्यात आली. त्यात प्रामुख्याने

1. पत्रकरांसाठी सर्वात आधी संरक्षण कायदा करावा.

2. 25 वर्षे पत्रकारीतेत पूर्ण झालेल्या पत्रकारांना पेंशन सुरु करावी.

3. शासकीय रुग्णालयात पत्रकारांची वैद्यकीय तपासणी औषध उपचार शस्त्रक्रियेसह मोफत व्हावीत.

4. अनियमित दैनिके/ साप्ताहिके यांना वर्षातून 4 शासनच्या दर्शनी जाहिराती मिळाव्यात. हे ठराव मंजूर करण्यात आले.

याबाबतचे निवेदन लवकरच पालक मंत्री, महासंचालक यांना देण्यात येणार आहे. अधिस्विकृती धारक पत्रकारांना सुविधा मिळतात पण पण जे अधि स्वीकृतीधारक नाहीत त्यांनाही या सुविधा मिळाव्यात अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.बैठकीस सुनंदा मोरे, प्रकाश मोरे, ताज मुल्लाणी,शीतल धनवडे, राहुल जगताप, राहुल खाडे, भाऊसाहेब गणफुले, मालोजी केरकर, सचिन कौलकर, शुभांगी तावरे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!