
कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहातील स्पर्धेत डॉ.डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले. वॉटर या थीम ची निवड करत दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर पावसाचे पाणी वर्षभर कसे साठवून ठेवता येईल यावर अभ्यास करून सेल्फ सस टेंनिग व्हिलेज हा प्रकल्प सादर केला. अनेक देश विदेशातील प्रकल्प मेक इन इंडिया मधे सादर केले गेले पण या इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्रकल्पास पहिल्या 10 नामांकनामधे जागा मिळाली. यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. टी.बी.मोहिते- पाटील यांनी दिली.
प्रवीण मेंगाणे, प्रतिश वाले, प्रणव भटाले आणि रविराज पाटील या चार विद्यार्थ्यांनी शाहुवाडी तालुक्यातील साळशी हे गाव निवडून हा प्रकल्प सादर केला. स्पर्धेत निवड झालेल्या प्रकल्पांची पाहणी करून याची अमल बाजावणी राष्ट्रीय स्तरावर होणार आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटु शकतो तसेच दुष्काळाची परिस्थिति उद्भवणार नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील . खरोखरच भविष्यात हा प्रकल्प मार्गदर्शक आणि महत्वाचा ठरणार आहे. विद्यर्थ्यांना डीन संग्राम पाटील, डायरेक्टर विश्वनाथ गोसावी, प्रा. गौरव देसाई व विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply