दीक्षान्त समारंभाचे उद्या थेट वेबकास्टींग

 

20151103_212040-BlendCollage

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५२वा दीक्षान्त समारंभ उद्या दुपारी आयसीटी, मुंबईचे कुलगुरू पद्मश्री डॉ. जी.डी. यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा होणार आहे. या समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या वेबसाइटवरुन करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in व suk.digitaluniversity.ac या वेबसाइटवर दुपारी एक वाजल्यापासून विद्यापीठाच्या ५२व्या दीक्षान्त समारंभाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील माजी विद्यार्थ्यांसह नागरिकांना या समारंभाचा आनंद घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!