
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा 52 वा दिक्षांत समारंभ आज संपन्न झाला . शाश्वत विकास घडविण्यासाठी भारताला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.सांडपाणी वायु प्रदुषण रस्ते बांधाणी सौर ऊर्जा बॉयोगॅस स्मार्ट सिटी अशा नव्या संकल्पना विज्ञान आणि तंत्र ज्ञानवरच पुढे जाईल. यासाठी शिवाजी विद्यापीठसारख्या विद्यापीठानी पुढे येणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन पद्मश्री प्राप्त मुंबई च्या इन्स्टीट्यूट ऑफ़ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरु आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र प्रा. डॉ. जी.डी. यादव यांनी केले.त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदविदान समारंभ पार पडला. यावर्षी 52 हजार 160 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.यात 301 स्नातकां नी पी एच डी ची पदवी घेतली. कुलगुरु प्रा. डॉ.देवानंद शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अहवालाचे वाचन केले. यावेळी प्र कुलगुरु व्ही एन शिंदे पद्मश्री शिवराम भोज पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, विभाग प्रमुख प्राध्यापक अणि विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply